सुतार समाज कल्याण प्रतिष्ठान

सुतार समाज वेल्फेअर फाउंडेशन

उद्देश

सुतार समाज. हा एक महत्त्वाचा सेवा पुरवणारा घटक आहे. पूर्वी बलुतेदारी पद्धतीमध्ये गाव खेड्यामध्ये शेती अवजारे निर्मिती दुरुस्ती व बांधकाम क्षेत्रातील कामे करून उदरनिर्वाह होत होता पण नवीन तंत्रज्ञानामुळे व एकंदरीत बदलत्या परिस्थितीमुळे काम उपलब्ध होत नसल्याने चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला. काहींनी शहराकडे स्थलांतर करून तर काहींनी गावातच विविध मजुरी किंवा उपलब्ध होईल ती कामे करून उदरनिर्वाह करत आहे. स्थावर मालमत्ता म्हणजेच शेती नसलेला हा समाज अतिशय हालाखीच्या स्थितीत जीवन कंठत आहे. या सर्व कारागीर घटकांसाठी एक समर्थन प्रणाली म्हणून काम करण्याचा विचार आहे.

ध्येय

सुतार, लोहार, पाथरवट, ताम्रकार, कुंभार, बुरुड, चर्मकार तसेच अनेक असंघटित क्षेत्रातील कारागिरांचे जीवनमान उंचावणे व त्यांचा सर्वांगीण विकास साधणे.

धोरण

लोकसंघटन करुन विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थींना मिळवून देण्यासाठी, प्रत्येक तालुका पातळीवर या लोकांच्या कायम संपर्कात राहणे. कागदपत्रांची पूर्तता करणे योजनांची माहिती देऊन निवड करणे व लाभ मिळवून देणे. जाणीव जागृती करणे, माहितीचे आदान प्रदान करणे व अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधून कार्यवाही करणे.

क्षमता व कौशल्य आधारित व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे यासाठी आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षण देणे. उद्योजकता वाढीसाठी वैयक्तिक, गटामध्ये अथवा सहकारी संस्था माध्यमातून, उद्योग व्यवसाय संकल्पना पुर्ण करण्यासाठी त्यांना मदत, सहकार्य आणि मार्गदर्शन करणे व सोबत संबंधित योजनेचा लाभ मिळवून देणे. तालुका पातळीवर "विकासदूत" यंत्रणेमार्फत माहितीनुसार प्रश्नांची सोडवणूक करणे.

कार्यपद्धती

यामध्ये प्रत्येक स्थानिक पातळीवर संस्था, संघटना यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने "विकासदूत" नेमून कार्य पुढे नेणारी यंत्रणा निर्माण करणे. प्रत्येक तालुक्यात समन्वयासाठी ज्येष्ठ अथवा तज्ञ व्यक्तींना विनंती करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणे. महाविद्यालयीन विद्यार्थी अथवा नुकतेच शिक्षण संपवून नोकरी शोधत आहे असे तरुण किंवा ज्यांना करिअर म्हणून ई-सेवा केंद्र चालू करायचे आहे त्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे. ई-सेवा केंद्र स्वतःच्या पैशाने, क्षमतेनुसार सुरू करावे, हि अपेक्षा आहे. ई-सेवा केंद्र चालू करण्यासाठीची अर्थिक क्षमता नसेल तर संबंधित क्षेत्रातील संघटना कार्यकारिणी मदत घ्यावी लागेल. स्थानिक कार्यकारिणी देखील तेवढी सक्षम नसेल तर किंवा स्थानिक संघटना उपलब्ध नसेल तर सुतार समाज वेल्फेअर फौंडेशन याकामी पुढाकार घेऊन मदत करील. यापैकी काहीच शक्य होत नाही हे लक्षात आले तर उपलब्ध ई-सेवा केंद्राशी बोलणी करून अधिकृत किंमतीत किंवा सवलतीच्या दरात कामे करून घेणे. "विकासदूत" स्थानिक असल्याने त्यांना संबंधित कुटुंबांची माहिती असणार आहे, नसेल तर स्थानिक संघटना व समन्वयक उपलब्ध करून देतील. तालुका पातळीवर समाजातील सर्वांची माहिती संकलित करून ठेवणे व त्यांच्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे. अपडेट करणे तसेच आवश्यकतेप्रमाणे नव्याने मिळवणे. स्थानिक पातळीवर नियमितपणे मिटिंग आयोजित करुन, अजेंडा ठरवून त्याप्रमाणे चर्चा, निर्णय घेण्यात येऊन कामकाज करणे. या सर्वांचा मिटिंग अहवाल, कार्य अहवाल व अर्थिक अहवाल तयार करणे. सहभागींच्या मागणी व गरजेनुसार सहकार्य, मार्गदर्शन करणे तसेच आवश्यकतेनूसार प्रशिक्षण उपलब्ध करणे. संस्थेच्या ध्येय,धोरण, कार्यप्रणाली नूसार विविध उपक्रम राबविण्यात यावेत.

कार्यप्रणाली

संस्थेच्या रचनेत कार्य संचालनासाठी अध्यक्ष, सचीव, खजिनदार व चार संचालक असे कार्यकारी मंडळ असेल. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असल्याने सहा विभाग प्रमुख असतील, यामध्ये मुंबई, कोकण, प.महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र असे विभाग असतील.

प्रत्येक जिल्ह्यात एक संपर्क प्रमुख व प्रत्येक तालुक्यात एक तालुका संपर्क प्रमुख असेल व आवश्यकतेप्रमाणे मोठे शहर अथवा भौगोलिक परिस्थिती नूसार अतिरिक्त प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात येईल. हे सर्व स्वंयसेवी, सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते असतील. प्रत्यक्ष कामकाज करणे व वरील रचना यांचे सहकार्य, मार्गदर्शन मदत घेऊन नियमित व सातत्यपूर्ण काम हे समाज "विकासदूत" करतील व स्थानिक संघटना कार्यकारिणीचा सातत्याने काम करता येत नाही व वेळ देता येत नाही हि अडचण दूर होईल. यामुळे संघटना कामकाज संचालन करतानाच किमान एक हजार युवक-यूवतींना अर्थार्जनाची व समाज कार्याची संधी मिळेल, थोडक्यात त्यांना पुरेसा रोजगार मिळेल

तुम्हाला कसे करायचे आहे?

आज मुलांना मदत करायची का?

शिक्षणासाठी मदत

पोहोचण्यास कठीण असलेल्या समुदायांच्या दाराशी सेवा

वैद्यकीय मदत

पोहोचण्यास कठीण असलेल्या समुदायांच्या दाराशी सेवा

पर्यावरणासाठी मदत

पोहोचण्यास कठीण असलेल्या समुदायांच्या दाराशी सेवा

कायदेशीर मदतीसाठी मदत

पोहोचण्यास कठीण असलेल्या समुदायांच्या दाराशी सेवा

आमच्याबद्दल

सुतार समाज वेलफेअर फाऊंडेशन

कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत कलम ८ कंपनी आहे. आमचे ध्येय वाढ आणि विकासासाठी संसाधने आणि संधी प्रदान करून समुदायांना उन्नत करणे आहे. येणाऱ्या पिढ्यांना फायदेशीर ठरणारे शाश्वत, दीर्घकालीन बदल घडवून आणण्यावर आमचा विश्वास आहे. आमचे काम करुणा, सचोटी आणि खरा फरक घडवून आणण्याच्या वचनबद्धतेने मार्गदर्शित आहे.
2 K

कुटुंबांवर दरवर्षी परिणाम होतो

200 +

गावे

100 +

प्रकल्प

एसएसडब्ल्यूएफएम

आपण काय करतो

शिक्षणासाठी

भविष्याचे सशक्तीकरण: प्रत्येक मूल शिक्षण घेते आणि पूर्ण करते याची खात्री करणे

मुलांची सुरक्षा

बालपण संरक्षण: बालमजुरी, विवाह, तस्करी आणि गैरवापर यांचा सामना करणे

आरोग्यासाठी

एसएसडब्ल्यूएफएम - जीवनमान वाढवणे: पोषण आणि दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवणे

मुलांचा सहभाग

SSWFM - मुलांच्या आवाजाचे मूल्य आणि आदर केला जाईल अशा जागेचे पालनपोषण करणे

साध्य करण्याच्या दिशेने

शाश्वत विकास उद्दिष्टे

चांगले आरोग्य आणि कल्याण
सुलभ आरोग्यसेवा आणि निरोगीपणाच्या उपक्रमांद्वारे निरोगी भविष्याला चालना देणे.
लिंग समानता
सर्वांसाठी समावेशक आणि समतापूर्ण समाज निर्माण करून व्यक्तींना सक्षम बनवणे.
दर्जेदार शिक्षण
ज्ञानी आणि कुशल समुदाय निर्माण करण्यासाठी आयुष्यभर शिकण्याच्या संधी.
चांगले काम आणि वाढ
निष्पक्ष रोजगार आणि नवोपक्रमाद्वारे शाश्वत आर्थिक प्रगती साधणे.
टीम सदस्य

व्यवस्थापन संस्था

आमच्याशी संपर्क साधा.